शिंदे गटाचे उद्या डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन? मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या 'त्या' शाखेत हजेरी लावणार

सेनेच्या डोंबिवलीतील शाखेत उद्या, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. याच शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली
cm eknath shinde
cm eknath shinde saam tv

Eknath Shinde News : शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राजकीय संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी डोबिंवलीमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून दोन्ही गटात मोठा राडा झाला होता. त्यानंतर ही शाखा शिंदे गटाने घेतली. सदर सर्व प्रकरण सर्वात आधी साम टिव्हीने दाखवले होते. आता याच शाखेत उद्या, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. याच शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली असून आजूबाजूच्या इमारतीला भव्य रोषणाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

cm eknath shinde
Deepali Sayyad | दीपाली सय्यद यांचा उद्या शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या रविवारी १३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत येणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी डोंबिवलीत ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्याचे बॅनर डोंबिवली (Dombivli) शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले आहेत.

डोंबिवलीमधील ज्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून दोन गटात राडा झाला होता. आता ती शाखा शिंदे गटाने घेतली असून त्या शाखेत मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, याचे शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली असून याच शाखेत मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे उपस्थित राहणार आहेत. आजूबाजूच्या इमारतीला भव्य करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

cm eknath shinde
Bhaskar Jadhav : चंद्रशेखर बावनकुळेंना संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? भास्कर जाधव असे का म्हणाले?

शिंदे गटाचा कायदेशीर ताबा

गेल्या महिन्याभरापासून डोंबिवली मध्यवर्ती शाखा कोणाची यावरून वाद सुरू असल्याने तो विषय गाजत होता. शिंदे गटाला ठाकरे गटाकडून शाखेत येण्यास अटकाव झाल्याने शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न जणू निर्माण झाला होता.

मात्र, त्यानंतर कायदेशीररित्या शिंदे गटाने या शाखेवर ताबा मिळविला. उद्या याच शाखेत येणार असल्याने शिंदे गट उद्या डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन दाखवणार का, हे पाहावे लागणार आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com