Breaking : "खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलून लावलं"
"खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलून लावलं"SaamTvNews

Breaking : "खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलून लावलं"

चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात कट्टर विरोधक केंद्रीय मंत्री नारायण राणे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात कट्टर विरोधक केंद्रीय मंत्री नारायण राणे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहावयास मिळाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे कौतुक :

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली व मराठीतून भाषण केले. त्यांच्या या भाषणाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्योतिरादित्य आपण इतक्या दूर राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे आणि कोकणाचे नाते फार जुने असून चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा हा आनदं व्यक्त करण्याचा क्षण असून आदळआपट क्षण नव्हे. चिपी विमानतळाच्या माध्यमातून कोकणाच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. आज खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने भरारी घेतली आहे.

हे देखील पहा :

कोकणाची समृद्धता आणि वैभव गोव्यापेक्षा जास्त :

कोकणाची संपन्नता, समृद्धता आणि वैभव हे गोव्यापेक्षाही जास्त असून चिपी विमानतळाच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनातील महत्वाचा घटक विमनातळ असून यामुळे आता कोकणातली समृद्धता जगासमोर येणार आहे. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा मिळाल्याने कोकणच्या विकासास हातभार लागणार आहे.

विमानतळाला एवढी वर्षे का लागली :

चिपी विमानतळाच्या श्रेयवादाची लढाई टोकाला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाला एवढी वर्षे का लागली असा सवाल उपस्थित केला. मी फोटोग्राफी करताना अनेक गडी किल्ल्यांचे फोटो काढले. सिंधीदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधला आहे हे सर्वांना माहित आहे, नाहीतर काहीजण हा किल्ला आम्हीच बांधला असं म्हणतील, असा टोला राणेंना लगावताना आमच्या काळातच चिपी विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे ते म्हणाले.

"खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलून लावलं"
अलिबागमध्ये भरदिवसा चोरट्यांनी फोडले तीन फ्लॅट; लाखोंचा ऐवज लंपास!

"पाठांतर करून बोलणं वेगळं"

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना खोचक टोला लगावला, "पाठांतर करून बोलणं वेगळं, आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं आणि मळमळीने बोलणं तर फार वेगळं" असे ते म्हणाले.

"खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून हाकलून लावलं"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा रोख प्रामुख्याने नारायण राणे यांच्याकडे होता. नारायण राणे यांनी या कार्यक्रमात बोलताना, "खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती" असं वक्तव्य केलं होत. राणेंच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या नेत्यांचा दाखला देत, म्हटलं कि, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं अजिबात आवडत नव्हती. त्यामुळेच त्यांनी अनेक लोकांना त्या काळात शिवसेनेतून हाकलून लावलं होतं.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.