थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत

CM Udhav Thackeray Live : मुंबईतल्या बी.के.सी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता या सभेला सुरूवात होणार आहे
थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत
Uddhav Thackeray LiveSAAM TV

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) आणि त्यापाठोपाठ भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या सभांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या सभांमधून प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने सुद्धा आज (शनिवारी) एक महाविराट सभा आयोजित केली आहे. मुंबईतल्या बी.के.सी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता या सभेला सुरूवात होणार असून, सभेसाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. (CM Uddhav Thackarey Live)

Uddhav Thackeray Live
"फडणवीस जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले, तेव्हापासून राजकारणाचा स्तर खालावला"

दरम्यान, थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी बी.के.सी मैदानाबाहेर मोठी गर्दी केली आहे. नवी मुंबई, कल्याण, पालघर तसच राज्याच्या कानाकोप-यातून हे शिवसैनिक सकाळीच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. आजच्या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांवर कोणता घणाघात करणार याचीच उत्सुकता शिवसैनिकांना आहे.

हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे असं म्हणत शिवसेनेनं कार्यकर्त्यांना साद घातली आहे. यानिमित्ताने शिवसेना जबरदस्त शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या 2 महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांवरून महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. तर भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकलं होतं. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.