Cobra In Tiger's Cage : वाघाच्या पिंजऱ्यातच शिरला कोब्रा अन्..! नागपूरच्या महाराजबागेतला VIDEO व्हायरल

Nagpur's Maharajbagh Zoo : याआधीही अशीच एक घटना घडल्यामुळे एका वाघिणीला आपला जीव गमावावा लागला होता.
Cobra entered in tiger's cage , Incidents at Nagpurs Maharajbagh Zoo
Cobra entered in tiger's cage , Incidents at Nagpurs Maharajbagh ZooSAAM TEAM

Nagpur News: नागपूरच्या प्रसिद्ध महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात कोब्रा नाग शिरल्याचा घटना समोर आली आहे. प्राणिसंग्रहालयात भेट देणाऱ्या एका पर्यटकानं हा व्हिडीओ काढला. त्यानंतर काही वेळातच या सापाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले. पर्यटनासाठी आलेल्या सतर्क नागरिकामुळे वाघाच्या जीवावरील धोका टळला.

Cobra entered in tiger's cage , Incidents at Nagpurs Maharajbagh Zoo
Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कोणते शब्द जास्त वेळा वापरले? वाचा इंटरेस्टिंग माहिती

दरम्यान, याआधीही अशीच एक घटना घडल्यामुळे एका वाघिणीला आपला जीव गमावावा लागला होता. पाच वर्षांपूर्वी जाई नावाच्या वाघिणीला सापाने दंश केला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावून किडन्या फेल झाल्या होत्या आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. (Nagpur News)

Cobra entered in tiger's cage , Incidents at Nagpurs Maharajbagh Zoo
Budget 2023 Live Updates: भारताच्या अर्थव्यवस्थेची उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल - अर्थमंत्री

पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर वाघाच्या पिंजऱ्याभोवती सापाने प्रवेश करू नये यासाठी बारीक जाळी लावण्यात आली होती. मात्र ती जाळी आता सडली आहे. आता पुन्हा सापाने पिंजऱ्यात प्रवेश केल्याने वाघाच्या जीवाला धोका निर्माण झालाय.

Edited By - Chandrakant Jagtap

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com