रूग्णालयात हलगर्जीपणा; सलाईनमध्ये निघालं झुरळ
रूग्णालयात हलगर्जीपणा; सलाईनमध्ये निघालं झुरळविश्वभूषण लिमये

रूग्णालयात हलगर्जीपणा; सलाईनमध्ये निघालं झुरळ

त्यातील एक सलाईन ठराविक कालावधीनंतर नंतर बंद पडत होता

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शीतील Barshi डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये निहिरा नीरज पुराणिक या ३ वर्षीय बालिकेला 27 ऑगस्ट दिवशी ब्रॉकायटीस Bronchitis आणि निमोनियाचा Pneumonia त्रास होत असल्याने ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये hospital उपचाराला सुरुवात केले. सलाईन ही लावण्यात आले. मात्र, त्यातील एक सलाईन ठराविक कालावधीनंतर नंतर बंद पडत होता.

हे देखील पहा-

यानंतर त्या सलाईनची तपासणी केल्यावर त्यात चक्क झुरळ असल्याचे दिसून आले आहे. यामुळे तात्काळ ते सलाईन बंद करण्यात आले. आणि रुग्णाच्या जीवाला होणारा मोठा धोका टळला आहे. मात्र,याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे administration विचारपूस केली असता, उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. यामुळे रुग्णांच्या आरोग्यसोबत होणारी हेळसांड लवकरच थांबण गरजेच आहे. दरम्यान, निहिरा पुराणिक हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून तिची तब्यत सध्या व्यवस्थित आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com