Nagpur : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊतांच्या फोटोला लावला भगवा रंग

भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या बॅनर वरील फोटोला भगवा रंग लावला असल्याची तक्रार नितीन राऊत यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
Nagpur : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊतांच्या फोटोला लावला भगवा रंग
Nagpur : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊतांच्या फोटोला लावला भगवा रंगसंजय डाफ

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या बॅनर वरील फोटोला भगवा रंग लावला असल्याची तक्रार नितीन राऊत यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

काल भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या रविभवन येथील सरकारी बंगल्याबाहेर आंदोलन केलं होते आणि त्यावेळी 'विद्यापीठ बचाओ आंदोलन केले. काळे विधेयक मागे घ्या जाहीर निषेध, अशा आशयाचे बंद दारावर बॅनर भारतीय जनता युवा मोर्चाने लावले असल्याचही राऊत यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये उल्लेख आहे.

Nagpur : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नितीन राऊतांच्या फोटोला लावला भगवा रंग
अमरावती महानगरपालिका समोर पोलीसांचा तगडा बंदोबस्त

तसेच या कार्यकर्त्यांनी जमीनीवरती 'विद्यापीठ बचाओ आंदोलन काळे कायदे मागे घ्या, जाहीर निषेध, भाजपा युवा मोर्चा अशा आशयाच्या घोषणा असणा-या रांगोळ्या काढून विद्रुपीकरण केले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवरती आता नितीन राऊत यांच्या बंगल्याबाहेर प्रशासनाने सुरक्षा वाढविली असून जिल्ह्यात रात्री संचारबंदी (Curfew) असतांना जमावाने येऊन घोषणाबाजी, निदर्शने केली आहेत त्य़ामुळे या घटनेचा निषेध करत दोषीविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचंही कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

हे देखील पहा -

काय आहे प्रकरण -

सार्वजनिक विद्यापीठ कायदा (Public University Act) सुधारणा विधेयकाविरोधात भाजयुमोने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. सुधारणा विधेयक म्हणजे विद्यापीठाच्या स्वायत्ततेमध्ये हस्तक्षेप करणारे पाप महाविकास आघाडी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसचं या सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा विद्यापीठाच्या जमिनींवर डोळा आहे तसंच या विधेकामध्ये दुरुस्ती करुन हे सरकार पदव्या विकण्याचे कामही करेल, असा आरोप ही भाजयुमोने याधी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com