'कोणतीही कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांनो कामावर या'; रायगड जिल्हा ST प्रशासनाचे आवाहन

घरोघरी जाऊन करीत आहेत मनधरणी
'कोणतीही कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांनो कामावर या'; रायगड जिल्हा ST प्रशासनाचे आवाहन
'कोणतीही कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांनो कामावर या'; रायगड जिल्हा ST प्रशासनाचे आवाहनराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : जिल्ह्यात 2 हजार 250 एसटी कर्मचारी हे राज्य परिवहन महामंडळ मध्ये कार्यरत आहेत. तीन महिन्यापासून एसटीचा संप (ST Strike) हा सुरूच आहे. संप काळात 574 जणांवर निलंबन तर 121 कर्मचऱ्याची सेवा समाप्ती कारवाई करण्यात आली आहे. (Raigad Latest News In Marathi)

जिल्ह्यातील 21 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या साडे आठशे कर्मचारी हे पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. जिल्ह्यातील साडे पाचशे कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई एसटी प्रशासनाने केलेली नाही. अशा कर्मचाऱ्यांना अधिकारी घरोघरी जाऊन कामावर येण्यासाठी मनधरणी करीत आहेत. या कर्मचार्यांनी त्वरित हजर व्हा तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. त्यामुळे त्याच्या या आवाहनाला किती कर्मचारी प्रतिसाद देणार याकडे लक्ष लागले आहे. (Raigad News)

'कोणतीही कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांनो कामावर या'; रायगड जिल्हा ST प्रशासनाचे आवाहन
Breaking: पुण्यात पुन्हा एकदा MPSCच्या उमेदवाराची आत्महत्या! (पहा Video)

रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग (Alibaug) आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळ शासनात विलनीकरण करा या मागणीसाठी 4 नोव्हेंबर पासून संपाची हाक दिली. त्यानंतर जिल्ह्यातील आठही आगारातील कर्मचाऱ्यांनी या संपात उडी घेतली आणि एसटीचा चक्का जाम झाला. एसटी कर्मचाऱ्याचा संप मिटविण्यासाठी शासन आणि प्रशासन हरतर्हेनें प्रयत्न करू लागले मात्र कर्मचारी यांनी आरपारची भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवा समाप्ती, बडतर्फ कारवाई करण्यात आली. पुकारलेला संप बेकायदेशीर आहे म्हणून न्यायालयात याचिकाही दाखल केली. मात्र कर्मचारी हे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. (ST Strike Latest Updates)

हे देखील पहा-

रायगड जिल्ह्यात एसटी रुळावर येत असून जिल्ह्यातील सर्व आगारातून एसटी बस सेवा हळूहळू सुरू झाली आहे. 2 हजार 250 कर्मचाऱ्यांपैकी 1600 हुन अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर साडे आठशे कर्मचारी हे कामावर रुजूही झाले. उर्वरित साडे पाचशे कर्मचारी याच्यावर अद्याप प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही मात्र ते कामावर रुजूही झालेले नाहीत. अशा कर्मचाऱ्याचा घरी जाऊन अधिकारी त्यांना समजावून पुन्हा कामावर येण्यास विनंती करीत आहेत. लवकरात लवकर कामावर हजर व्हा तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासित केले जात आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला काही कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला असल्याने उर्वरित कर्मचारीही हजर होतील अशी आशा पल्लवित झाली आहे. (Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com