हिंगोली जिल्हा कोरोनामुक्तीकडे
हिंगोली जिल्हा कोरोनामुक्तीकडे

दिलासादायक : हिंगोली जिल्हा कोरोनामुक्तीकडे; रविवारी एकही रुग्ण आढळला नाही

सद्य: स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी ता. चार एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून औंढा रोडवरील नविन कोविड सेंटर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

रविवारी (ता. चार) २४६ जणांची अँटीजन टेस्ट केली यामध्ये हिंगोली परिसर १५७, कळमनुरी ८६ तर सेनगाव चार अश्या एकूण २४६ नागरिकांची अँटीजन तपासणी केली असता एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. तसेच २८२ नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये हिंगोली ६२, कळमनुरी १६२, औंढा ३२ ,वसमत ३२ सेनगाव बारा अश्या २८२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले व दोन्ही माळरानाच्या मध्यभागी वसलेले माळझरा (ता. हदगांव) गाव आहे.

सद्य: स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण १४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १५  हजार ९५०  रुग्ण झाले असून, त्यापैकी  १५ हजार ५४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण २२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ३८४ रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्यात लसीकरण व कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com