औरंगाबाद 'एमआयडीसी'मध्ये गुंडांचा हैदोस; कंपणी मालकालाच मारहाण!

औरंगाबाद एमायडीसीमधील एका कंपनीमध्ये गुंडांनी कंपनी मालकालाच मारहाण केल्यानं उद्योग जगत पुन्हा हादरले आहे.
उद्योजक असुरक्षित?..औरंगाबाद एमआयडीसीत दादागिरी वाढली
उद्योजक असुरक्षित?..औरंगाबाद एमआयडीसीत दादागिरी वाढलीSaam Tv

औरंगाबाद :औरंगाबाद एमायडीसीमधीलAurangabad MIDC एका कंपनीमध्ये गुंडांनी कंपनीCompany मालकालाच मारहाणbeaten केल्यानं उद्योग जगत पुन्हा हादरले. गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सातत्याने होणारे हल्ले, ब्लॅकमेलींग, खंडणी वसूल करणे आणि आता झालेली ही जबर मारहाण यामुळे औरंगाबाद शहरात उद्योग करायचा की नाही असा सवाल उद्योगजगताच सुरु झाला आहे. Company owner beaten in Aurangabad MIDC

हे देखील पहा-

औरंगाबादAurangabad हे शहर उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. दशकापूर्वी आशिया खंडातलं वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख होती. पण उद्योग नगरीमध्ये वाढलेल्या गुंडगिरीमूळ, सरकारच्या आणि सरकारी यंत्रणेच्या धोरणामुळे उद्योगाच्या वाढीसाठी खीळ बसत चाललीय. औरंगाबाद हे औद्योगिक क्षेत्रात नावारूपाला येत असताना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दहशत पसरविणे, हल्ले करणे, धमकावून ब्लॅकमेलिंगBlackmailing करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शहरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांमधून चिंता वाढलीय. सातत्याने घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्याची मागणी टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि व्यापारी संघटनांनी केलीय.

औरंगाबाद एमआयडीसीमधील भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीशी Automotive companyकोणताही संबंध नसलेले दहा-पंधरा जणांचे टोळके शिरून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नित्यानंद भोगले यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत बेदम मारहाण केली.औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, हॉस्पिटल,Hospital पेट्रोलपंप,PetrolPump ट्रान्सपोर्ट,Transport वाहनांचे शोरुमShowroom या आस्थापनांमध्ये मारहाण करून दहशत निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडत असून यावरती पोलिसांनी ठोस करावाई करावी अशी मागणी कंपणी मधील अधिकारी वर्ग करत आहे.

उद्योजक असुरक्षित?..औरंगाबाद एमआयडीसीत दादागिरी वाढली
शक्तिमिल प्रकरणातील आरोपी आकाश उर्फ गोट्यावर आणखी एक गुन्हा दाखल !

या घटना वाढत असताना पोलिसांकडूनही ठोस कारवाई होत नाही. सीसीटीव्हीCCTV लावा, संरक्षक भिंतींची उंची वाढवा, सुरक्षारक्षकSecurity guard वाढवा असे सल्ले मिळत असून, पोलिसांकडूनही अशा समाजकंटकांविरुद्ध जुजबी कारवाई होत असल्यामुळे उद्योजक व व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करून तिघांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

औरंगाबाद शहराला लागून वाळुज, शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद अशा मोठ्या एमआयडीसी आहेत. सोबतच डीएमआयसीDMIC सारखा मोठा प्रकल्प औरंगाबादमध्ये विस्तारत आहे. मात्र गुंडगिरीमूळ हतबल झालेले उद्योजक नवी कंपनी स्थापन करण्यासाठी धजावत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या कंपन्या औरंगाबादमध्ये उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत, पण अशा घटना सातत्याने घडत असल्या तर औरंगाबादचे नाव बदनाम होईल अशी भीती आहे.

Edited By-jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com