आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड यांच्यासह शकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा प्रकरण
आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड यांच्यासह शकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड यांच्यासह शकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातुर Latur जिल्ह्यातील निलंगा Nilanga येथे महाविकास आघाडी सरकारच्या State Government निषेधार्थ गुरूवारी (ता. 18) रोजी भारतीय जनता पार्टीच्या BJP वतीने माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह हजारो नागरिकांनी काढलेल्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा संदर्भात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड यांच्यासह इतर आडीचशे कार्यकर्त्यांवर निलंगा पोलिस ठाण्यात Nilanga Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देणारे आंदोलनकर्ते माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार रमेश कराड यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन केले.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड यांच्यासह शकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
प्रियकराने वरातीत दिला लग्नास नकार; प्रेयसीने केला राडा, अन् धसक्याने मामाचा मृत्यू

यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. अखेर पोलिस नाईक प्रणव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, समाजकल्याण माजी सभापती संजय दोरवे, चेअरमन दगडू सोळुंके, पंचायत समिती सभापती राधा बिराजदार,अप्पाराव सोळुंके, शाहूराज थेटे, विरभद्र स्वामी, शाहूराज पाटील यासह आडीचशे कार्यकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवून राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध नोंदवल्याप्रकरणी निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस विभागाकडून कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com