Nashik: नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती विरोधात ED कडे तक्रार

तब्बल 20 वर्षात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
Nashik: नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती विरोधात ED कडे तक्रार
NashikSaam TV

नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती विरोधात (Nashik Agricultural Produce Market Committee) ED कडे तक्रार करण्यात आली आहे. नाशिक बाजारसमितीत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भाजपा पदाधिकाऱ्यांनी ईडीकडे केली आहे. सध्या नाशिक (Nashik) बाजारसमितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता आहे. 2013-14 च्या लेखपरिक्षणात हा घोटाळा उघड झाल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तब्बल 20 वर्षात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

सरकार आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पुराव्यांची अनेक कागदपत्रं ही ED कडे सादर केली आहेत. तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नाशिक भाजप पदाधिकारी दिनकर पाटील, सुनील केदार यांनी दाखल तक्रार दाखल केली आहे. आता ईडी संबंधीत तक्रारिची दखल घेवून कारवाई करणार का? याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com