जालन्यात रावसाहेब दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून कॉंग्रेसचे आंदोलन

काँग्रेसने रावसाहेब दानवेंचा प्रतिकात्मत पुतळा जाळला आहे. मात्र आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अनेक नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.
जालन्यात रावसाहेब दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून कॉंग्रेसचे आंदोलन
जालन्यात रावसाहेब दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून कॉंग्रेसचे आंदोलनलक्ष्मण सोळुंके

जालना : राहुल गांधी हे गावाला आणि देवाला सोडलेले सांड आहेत अशी टीका काल जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज जालन्यातील गांधींचमन चौकात रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. (Congress agitation by burning symbolic statue of Raosaheb Danve in Jalna)

हे देखील पहा -

रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा बेताल वक्तव्य करण्यासाठी आहे का? असा सवाल करत दानवे यांनी बेताल वक्तव्य करणं थांबवावे अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिलाय. दरम्यान या आंदोलनात मात्र आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या जालना नगरपरिषेदेवर काँग्रेसची एक हाती सत्ता असतानाही नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

जालन्यात रावसाहेब दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून कॉंग्रेसचे आंदोलन
इंधन दरवाढीविरोधात अंबरनाथमध्ये सिलेंडरची अंत्ययात्रा काढत राष्ट्रवादीचे आंदोलन

काल जन आशीर्वाद यात्रेत कैलाश गोरंट्याल यांनी सहभागी होऊन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांचा सत्कार केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यात दानवेंविरुद्ध आंदोलनातही त्यांचा सहभाग दिसला नसल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com