Nagpur Political News: अखेर तिढा सुटला! नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर अडबाले यांना कॉंग्रेसचा पाठिंबा जाहीर

२२ तारखेपासून कॉंग्रेस नेते सुधाकर आडबाले यांचा प्रचार करण्यात येणार आहे.
Nagpur Political News
Nagpur Political NewsSaam TV

Nagpur Political News: नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीत मदभेद असल्याचे पाहायला मिळाले. यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना काँग्रेसचे समर्थन मिळाले आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Nagpur Politics News)

नागपूर शिक्षक मतदार संघात कॉग्रेसचा सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर झाला असून २२ तारखेपासून कॉंग्रेस नेते सुधाकर आडबाले यांचा प्रचार करण्यात येणार आहे. नागपूर शिक्षक मतदार संघाच्या या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांच्यात मतभेद होते. त्यामुळे रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली.

Nagpur Political News
Congress | काँग्रेसच्या 138 व्या स्थापनादिवसानिमित्त भव्य जाहीर सभेची जोरदार तयारी,पाहा व्हिडीओ

या बैठकीत कॉंग्रेसचा उमेदवार असणार यावर निर्णय घेण्यात आला होता. कॉंग्रेसचा मार्ग मोकळा झाल्यावर सुधाकर अडबाले आणि राजेंद्र झाडे या दोन नावांची मोठी चर्चा सुरू होती. अखेर आज झालेल्या बैठकीत सुधाकर अडबाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Nagpur Political News
Nagpur : नागपुरात चौरंगी लढत, कोण मारणार बाजी ?, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

दरम्यान झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित नव्हते. त्यामळे घेतलेला निर्णय हा त्यांच्याशिवाय घेण्यात आला आहे. त्यामुळे यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना हटवा असं पत्र काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांना दिलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com