Balu Dhanorkar Passed Away : आयुष्यभर कष्ट करुन अलिशान ड्रीम होम बांधलं, पण बंगल्यात राहायचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Balu Dhanorkar News : धानोरकर यांच्या जाण्याने त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, कार्यकर्ते यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSaam TV

Chandrpur News : काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज किडनीसंबंधीच्या किडनीसंबंधीच्या आजाराच्या उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

धानोरकर यांच्या जाण्याने त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, कार्यकर्ते यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बाळू धानोरकर यांनी मोठ्या कष्टाने जिल्ह्यात आपलं राजकीय वजन वाढवलं होतं. एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे त्यांनी आपली प्रगती केली. (Latest Political News)

Balu Dhanorkar
Congress MP Balu Dhanorkar Passed Away : काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, वयाच्या 48व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी सुरु केली. भद्रावतीमध्ये त्यांनी बारही सुरु केला होता. मात्र त्यांचं एक स्वप्न अपूर्णच राहिलं आहे.

बाळू धानोरकर यांनी आपल्या स्वप्नातलं घर काही दिवसापूर्वीच बांधलं होतं. गेल्याच आठवड्यात या अलियाशन बंगल्याच्या वास्तुपूजनाचा सोहळा पार पडला होता. मात्र या सुसज्ज घरात राहण्याचे भाग्यही त्यांना लाभू शकले नाही.

Balu Dhanorkar
Cm Eknath Shinde On Building Audits : धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर  31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com