चंद्रपुरमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा !

वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे वाढते भाव, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आज काँग्रेस पक्षातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपुरमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा !
चंद्रपुरमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा !संजय तुमराम

चंद्रपूर : वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे वाढते भाव, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आज काँग्रेस पक्षातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. Congress bullock cart march against fuel price hike in Chandrapur

हे देखील पहा -

चंद्रपूर शहरातील भवानी माता मंदिरापासून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी सायकल आणि बैलगाडी चालवत सरकारवर जोरदार टीका केली.

चंद्रपुरमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा !
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणेसाठी 55 कोटींचा खर्च

यावेळी बोलताना आमदार सुभाष धोटे म्हणाले कि, सरकारने पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयांचा टॅक्स जमा केला आहे. मात्र, या पैशांचा अजून जनतेला हिशोब दिलेला नाही. ही महागाई सामान्य जनतेचं कंबरडं मोडणारी असल्याने याचा निषेध करण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com