धुळ्यात पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
धुळ्यात पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
धुळ्यात पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅलीभूषण अहिरे

धुळे : वाढती महागाई, इंधन दराच्या वाढत्या किंमती व सोबतच झपाट्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीविरोधामध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी "पेट्रोल-डिझेल 100 पार मोदी बस करा जनतेची लुटमार" अशा पद्धतीच्या घोषणा देत अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. Congress cycle rally against petrol price hike in Dhule

हे देखील पहा -

धुळे शहरातील आग्रा रोड शिवाजी महाराज पुतळा चौकापासून या सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व मुख्य चौकांमध्ये सायकल रॅलीने फेरी मारण्यात आली. काँग्रेस भवन पर्यंत अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धुळ्यात पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
मागणीत घट झाल्याने कांद्याचे बाजारभाव पडले...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेट्रोल-डिझेल दरवाढ झपाट्याने होत असल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com