Shirdi : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपुर्वी नेत्यानं घेतलं साईंचं दर्शन

आज संगमनेर येथील कार्यक्रमात काय बाेलणार याकडं लक्ष लागून राहिलं आहे.
shirdi , ashok gehlot , congress president election
shirdi , ashok gehlot , congress president electionsaam tv

- सचिन बनसाेडे

Shirdi : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज साई बाबांच्या (sai baba) दर्शनासाठी शिर्डीत (shirdi) आले आहेत. त्यांच्यासमवेत काॅंग्रेसचे (congress) नेते आमदार बाळासाहेब थाेरात यांच्या अन्य प्रमुख नेते उपस्थित आहेत. गेहलाेत हे पहिल्यांदाच शिर्डीत आल्याचे सांगण्यात आलं. (ashok gehlot latest marathi news)

काॅंग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची निवडणुक आगामी काळात हाेणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी गेहलाेत हे उमेदवार असणार आहेत असे पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. ही निवडणुक हाेण्यापुर्वी गेहलाेत शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी आले आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे साईंच्या दर्शनानंतर संगमनेर येथे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत काॅंग्रेस नेते बाळासाहेब थाेरात हे देखील साई बाबा मंदिर परिरात उपस्थित हाेते. सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी गेहलोत यांचे नाव आघाडीवर असल्याने ते आज संगमनेर येथील कार्यक्रमात काय बाेलणार याकडं लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

shirdi , ashok gehlot , congress president election
पुणे नवरात्रौ महोत्सव २०२२ : प्रमुख मान्यवरांच्या मांदियाळीत उत्सव रंगणार, वाचा सविस्तर
shirdi , ashok gehlot , congress president election
Chandur Railway : गुंड नईम खानचा रात्री झाला गेम; पाेलिसांनी धरला दाेघांवर नेम

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com