Congress : 'मार्ग माेकळा.., काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चा करुन निर्णय घेईन'

पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा आम्ही करीत आहाेत असंही गेहलाेत यांनी नमूद केले.
Ashok Geholt , Shirdi , Congress , Balasaheb Thorat , Sai Baba Mandir , Sai Baba
Ashok Geholt , Shirdi , Congress , Balasaheb Thorat , Sai Baba Mandir , Sai BabaSaam Tv

- सचिन बनसाेडे

Ashok Geholt : साई बाबांचं दर्शन घेतलं आहे. मार्ग खूला झाला आहे. हायकमांडचा निराेप येताच मी तयार आहे असं काॅंग्रेस नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नमूद केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज साई बाबांचे (sai baba) दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी शिर्डीत (shirdi) माध्यमांशी संवाद साधताना त्यांची भुमिका स्पष्ट केली. त्यांच्यासमवेत काॅंग्रेसचे (congress) नेते आमदार बाळासाहेब थाेरात यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित हाेते. (ashok gehlot latest marathi news)

अशाेक गेहलाेत म्हणाले देशातील सर्व नागरिकांना आनंदी ठेव अशी प्रार्थना साईंच्या चरणी केली. राहुल गांधी यात्रा करताहेत. त्यांचा हेतु देखील देशातील नागरिक सुखी रहावं हाच आहे. काॅंग्रेस पक्ष गावा गावात आहे. पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा आम्ही करीत आहाेत असंही गेहलाेत यांनी नमूद केले.

Ashok Geholt , Shirdi , Congress , Balasaheb Thorat , Sai Baba Mandir , Sai Baba
पुणे नवरात्रौ महोत्सव २०२२ : प्रमुख मान्यवरांच्या मांदियाळीत उत्सव रंगणार, वाचा सविस्तर

गेहलाेत म्हणाले आज मी साई बाबांचं दर्शन घेतलं आहे. काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या माझ्या कानावर देखील येत आहेत. आज साईंचं दर्शन घेतल्यानंतर पुढचा रस्ता खुला झाला आहे. सर्वांशी चर्चा करुन निवडणूकीत उतरण्याची तयारी गेहलाेत यांनी करु असं म्हटलं.

ते म्हणाले काँग्रेस मजबूत व्हावी ही आमच्या सर्वांची इच्छा व अपेक्षा आहे, सर्व गावात काँग्रेस आहे. चढ उतार येतात. पुन्हा जनतेच मन जिंकू. सध्या संविधानाचा फज्जा उडवला जात आहे असा राेख गेहलाेत यांनी माेदी सरकारवर राेखला. ते म्हणाले केंद्रीय यंत्रणाचा गैर वापर सुरू. आहे. खरंतर पंतप्रधान मोदींनी बंधू भावानं राहावं असेही गेहलाेत यांनी नमूद केले.

Ashok Geholt , Shirdi , Congress , Balasaheb Thorat , Sai Baba Mandir , Sai Baba
Solapur News : शिक्षिकेशी लगट, माजी महापाैरांच्या आली अंगलट; गुन्हा दाखल

दरम्यान मुख्यमंत्री आणि काॅंग्रेस अध्यक्षपद या दोन्ही पदाबाबत मिडीयाने चुकीचा अर्थ लावून बातम्या चालविल्याचे गेहलाेत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले लोकांनी चुकीचा अर्थ काढला आहे. सध्या निवडणुकीची तारीख निश्चित नाही. हायकमांड जे सांगेल ते कराव लागेलच असेही गेलहाेत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अट्टहास नाही.

Edited By : Siddharth Latkar

Ashok Geholt , Shirdi , Congress , Balasaheb Thorat , Sai Baba Mandir , Sai Baba
Shirdi : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपुर्वी नेत्यानं घेतलं साईंचं दर्शन

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com