Nana Patole: पहाटेच्या शपथविधीवर नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट, थेट नाव घेत म्हणाले; 'हा सगळा चमत्कार...'

यावेळी कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Nana Patole Exclusive)
nana patole
nana patole saam tv

Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवार यांना कल्पना होती, असे विधान केले होते. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरूवात झाली होती.

यावर बोलताना शरद पवार यांनीही, या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठल्याचे सुचक विधान केले होते. आता या सगळ्या वादावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी महत्वाचा आणि मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Nana Patole EXclusive)

nana patole
Kolhapur : बहुचर्चीत काेल्हापूर घरफाळा घोटाळा प्रकरणी कर निर्धारक संजय भाेसले अटकेत

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामटीव्हीला एक्सक्लूजिव मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्याचे राजकारण, पुणे पोट निवडणूक तसेच केंद्रातील मोदी सरकारविरोधात असलेली नाराजी बोलून दाखवली. यावेळी नाना पटोले यांनी सध्या गाजत असलेल्या पहाटेच्या शपथविधीवरही मोठा खुलासा केला आहे..

काय म्हणाले नाना पटोले...

"याबद्दल देवेंद्र फडणवीस किंवा शरद पवार (Sharad Pawar) काय म्हणतात ते महत्वाचे नाही. आता या घटनेला साडेतीन वर्षे उलटली असून ती पहाट महाराष्ट्रातीलचं नव्हेतर देशातील जनता विसरू शकत नाही," असे ते म्हणाले. तसेच "सरकार हे उजेडात लोकांच्या समोर स्थापन होते. मात्र लोक झोपलेली असताना पहाटेचा शपथविधी घेण्याचा, सरकार स्थापन करण्याचा चमत्कार भाजपने पाठवलेल्या राज्यपालांनी केला," असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

nana patole
Maharashtra Politics : आम्ही शत्रू नाहीच; आदित्य ठाकरेंच्या मैत्रीच्या सूरांनंतर फडणवीसांनीही आळवला 'राग'

प्रदेशाध्यक्षपदाबद्दल केला मोठा खुलासा..

यावेळी त्यांना त्यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, "मी आत्तापर्यंत मी काहीच मागितल नाही, माझ्यावर हायकमांड जी जबाबदारी सोपवेल ती मी घेण्यास तयार आहे,' असे म्हणत कॉंग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच माझे काम असल्याची," प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान यावेळी पुण्यामधील कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Maharashtra Politics)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com