Nana Patole News: ओबीसी आग, सरकारने आगीत हात घातला तर सरकार जळून जाईल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Nana Patole News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आग, सरकारने आगीत हात घातला तर सरकर जळून जाईल, अशा शब्दात राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam tv

शुभम देशमुख

Nana Patole on OBC Reservtion:

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आग, सरकारने आगीत हात घातला तर सरकर जळून जाईल, अशा शब्दात राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

नाना पटोले म्हणाले, 'आरक्षणाचे सर्व मार्ग खुले आहेत. ते भाजपाला जमत नसेल, तर त्यांनी देशातील आणि राज्यातील सत्ता काँग्रेसला द्या. ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण मिळून देऊ, असा दावा त्यांनी केला आहे. केंद्र व राज्य सरकार जातीय जनगणनेच्या विरोधात आहे.

'आता आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओबीसी ही आग असून ओबीसींच्या आरक्षण हात लावण्याची हिंमत सरकारने करू नये, सरकारच जळून जाईल, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे.

Nana Patole
Kalyan News: अत्यंत लाजिरवाणं! गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांचा नकार; प्रवेशद्वारावर दिला बाळाला जन्म

मणिपूरच्या प्रश्नावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, 'रावण जेव्हा अत्याचार करायचा, तेव्हा हसायचा. त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटनेचा प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत मांडला. त्यावेळी या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच न बोलता हसत होते. हीच खरी शोकांतिका असून महिलांवर प्रश्नार मोदी रावणाप्रमाणे हसत असतील तर याची चीड नक्कीच येणार आहे'.

Nana Patole
Maharashtra Rain Update: आज देशात सर्वाधिक पाऊस कोकणातील दापोलीत; पुढील २४ तासांत कुठे कोसळणार?

शिवाजी महाराजांच्या वाघनखाबाबत बोलताना पटोले म्हणाले की, 'सरकारने विदेशातून चित्ते आणले होते. आता शिवाजी महाराजांचे वाघनखे आणण्याच्या गोष्टी करणे म्हणजे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. 2014 मध्ये भाजपचे सरकार आले, तेव्हा दाऊदला पकडून आणू. मात्र, दोनदा यांचे सरकार आले. मात्र दाऊदला आणू शकले नाही, असा टोला नाना पटोले यांनी सरकारला लगावला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com