'जेव्हा जेव्हा काँग्रेससोबत कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे', वडेट्टीवारांनी डागली तोफ

कॉंगेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
'जेव्हा जेव्हा काँग्रेससोबत कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे', वडेट्टीवारांनी डागली तोफ
Vijay WadettiwarSaam Tv

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आज सकाळी ईडीच्या कार्यालयात राहुल गांधी हजर झाले. राहुल गांधींची (Rahul Gandhi) ईडीने तीन तास चौकशी केली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यालयात त्यांना आज हजर राहता आले नाही. दरम्यान, गांधी कुटुंबीयांना केंद्र सरकारने (central government) सूडभावनेने ईडीने नोटीस पाठवल्याचा दावा कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंगेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारवर कॉंगेसच्या मंत्र्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Vijay Wadettiwar
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी; देवेंद्र फडणवीस

कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ईडीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपल आहे, असा घणाघात वडेट्टीवारांनी विरोधकांवर केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गांधी परिवाराला नोटीस देऊन मोदींनी घाबरून गेले असल्याचे संकेत दिले आहेत. 2024 मध्ये देशात काँग्रेस सरकार येईल,याची सुरुवात आजपासून झाली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत जो कोणी नडला त्याचं राजकारण संपलं आहे. मलाही नोटीस आली आहे. भाजप मध्ये नेते गेले की ते स्वच्छ होतात. चार रस्ते बनवून विकास होत नाही, देशात बेरोजगारी वाढली आहे. सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी गांधी परिवारावर हा प्रयोग करण्यात आला आहे.

Vijay Wadettiwar
बीजिंगच्या 'बार'मध्ये कोरोना विस्फोट! 166 जणांना लागण, मास टेस्टिंग सुरू

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, जेव्हा इंदिरा गांधींना अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशातील कायदा सुव्यवस्था ढासळून पडली होती. ज्या राहुल गांधींनी आजी-आजोबा, वडिलांच्या शरीराचे तुकडे तुकडे पाहिलेत. ते राहुल गांधी ईडीला घाबरणार नाही. 'आज ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है'. जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढं आम्ही पेटून उठू, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. सोनिया गांधी यांनी सगळ्या खासदारांची इच्छा असतानाही पंतप्रधान पदाचा त्याग केला, असंही ते म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com