
सांगली : देशात हुकूमशाही पद्धतीने वाटचाल सुरू आहे. राजकीय द्वेष मनात ठेवून विरोधी पक्षाचा आवाज दाबून सुरू असलेला छळवाद देशाच्या लोकशाहीला घातक असल्याची टीका माजी कृषीराज्यमंत्री व काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Congress MLA Vishwajeet Kadam) यांनी भाजपवर केली आहे. ते सांगली येथे बोलत होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरती विश्वजीत कदम यांनी भाजपवरर टीका केली. कदम म्हणाले, देशात लोकशाही राहिली आहे की नाही ? असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे.
पाहा व्हिडीओ -
ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधीपक्षाचा आवाज दाबला जातोय, हे देशासाठी घातक आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. एखाद्याची चौकशी करायची असेल तर निश्चितपणे न्याय प्रक्रियेत योग्य पद्धतीने व्हावी. पण जेव्हा एखादा आवाज उठवला जातो, तो सर्वसामान्य लोकांसाठी उठवला जातो.
सरकारकडून काही चुकीचं घडत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवला की लगेच केंद्रीय यंत्रणाकडून त्रास दिला जातोय. एक वेगळ्या पद्धतीचे हुकूमशाही या देशांमध्ये आणण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेले हे सरकार करत आहे. हे दुर्दैवी बाब आहे.
परंतु त्यांना देशाचा इतिहास माहित नाही, ज्यांनी ज्यांनी जुलमी कारभार देशावर केला, त्यांच्या विरोधात मोठी लाट उभी राहिली. त्या जुलूमला नष्ट करण्याचं काम देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी थोर पुरुषांनी वीर पुरुषांनी केलेले आहेत, त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल. असं मत यावेळी कदम यांनी व्यक्त केलं.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.