उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा धुडगूस

आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा धुडगूस
उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा धुडगूसकैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. Congress Riot in Osmanabad City Police Station

हे देखील पहा -

मात्र यासाठी त्यांनी कुठलाही परवाना घेतला नव्हता या दरम्यान पोलिसांनी हे आंदोलन परवाना नसल्याचे कारण देत अडवले, याचा राग मनात धरून सर्व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन गोंधळ घालत तसेच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. अटक करा अटक करा असे म्हणत पोलिस ठाण्यात प्रवेश केला.

उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा धुडगूस
लातुरात VTS यंत्रणा कार्यान्वित, 504 बसेसची माहिती कळणार एका क्लिकवर

दरम्यान पोलिस निरीक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या गोंधळाप्रकरणी कुठलीही कारवाई आम्ही करणार नसून काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या वर कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलिस निरीक्षक बुधवन यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com