Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंची खदखद बाहेर; खूप राजकारण झालं, वेळ आल्यावर...

आमच्या कुटुंबियांवर गेल्या काही दिवसात खूप राजकारण झालं. मात्र त्यावर वेळ आल्यावर निश्चित बोलू, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलंय.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSaam TV

>> सुशील थोरात, सचिन बनसोडे

अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी अखेर मौन सोडले आहे. काँग्रेसने केलेल्या निलंबनाबाबत प्रतिक्रिया देताना सत्याजीत तांबेंनी म्हटलं की, आमच्या घराण्याला काही दिवसातच काँग्रेसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस पक्षाने केलेली कारवाई ही निराजनक आहे.

गेली 22 वर्ष काँग्रेसचे काम करत आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. पक्षात अंतर्गत काही प्रक्रिया आहेत. शिस्तपालन समितीच्या काही नियमावली आहेत. त्या सगळ्या नियमावलींना पायमल्ली करुन कुठल्याही पद्धतीचा खुलासा न मागता माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. योग्य वेळी मी याला उत्तर देईल, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. (Political News)

Satyajeet Tambe
Satyajeet tambe : काँग्रेसमधून सत्यजित तांबेचं निलंबन; पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

आमच्या कुटुंबियांवर गेल्या काही दिवसात खूप राजकारण झालं. मात्र त्यावर वेळ आल्यावर निश्चित बोलू, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलंय. युवकांनी एका युवक प्रतिनिधीला साथ द्यावी आणि निवडणुकीत सहभाग घ्यावा हेच माझे आवाहन आहे.

माझ्या वडिलांनी गेली पंधरा वर्षे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे काम यशस्वीपणे केलं आहे. वडिलांच्या कामामुळे मतदार संघातील माणसं पक्ष सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेत. त्यांनी केलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठीच मी यावेळी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.

वडिलांवर जसं प्रेम तुम्ही केलं तसंच प्रेम माझ्यावर करावं आणि सर्वांनी आमच्या पाठीशी असच उभं राहावं, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Satyajeet Tambe
Mumbai News: रहस्यमयरित्या गायब झालेल्या सदिच्छाबाबत धक्कादायक माहिती उघड, तब्बल 14 महिन्यानंतर आरोपींनी तोंड उघडलं

सत्यजित तांबे यांचं निलंबन

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यांनंतर सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित केलं आहे. सत्यजित तांबेंना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असतानाही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. या पक्षविरोधी कारवाईबाबत पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com