कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी केलं मोठं ट्विट

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळं महाराष्ट्रात राजकीय वादळ घोंघावत आहे.
Kamalnath And sharad pawar meeting in mumbai
Kamalnath And sharad pawar meeting in mumbaisaam tv

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळं महाराष्ट्रात राजकीय वादळ घोंघावत आहे. या वादळाचा तडाखा महाविकास आघाडीला (mva government) बसला असून तो मुंबईतून गुवाहाटी पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरुच आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या दोन बड्या नेत्यांमध्ये काय खलबतं झाली ? असा सवाल राजकीय पटलावर उपस्थित झाला आहे. दरम्यान, कलमनाथ (Kamal Nath) यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी मोठं ट्विट केलं आहे.

Kamalnath And sharad pawar meeting in mumbai
'उध्दव ठाकरे यांच्यावरील संकट दूर व्हावे' शिवसैनिकांचे आराध्य दैवत राजेश्वराला साकडे

एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात आली असतानाच कॉंगेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना विशेष सूचना दिल्याचे समजते. भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं. कॉंग्रेसचे सर्व ४४ आमदार महाविकास आघाडी सरकारसोबत आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, असं म्हटलं होतं.

Kamalnath And sharad pawar meeting in mumbai
'...तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राष्ट्रपती राजवट लागेल'

याचदरम्यान कमलनाथ आणि शरद पवार यांच्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीबाबत शरद पवार यांनी ट्विट करुन माहिती दिली. मी आणि कॉंगेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी आगामी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत आणि इतर गोष्टींवर चर्चा केली, अशा आशयाचं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमुळं राजकीय वातावरण तापलं

दरम्यान, शिवसेना (Shivsena) विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्विट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

दिपाली सय्यद यांचं ट्विट चर्चेत

"माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल". अशा स्वरुपाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com