देश आणि संविधान वाचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचावे

सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मत व्यक्त केले,
देश आणि संविधान वाचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचावे
देश आणि संविधान वाचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचावेविजय पाटील

सांगली, 9 सप्टेंबर : 75 वर्षात देशाला काँग्रेसने बलशाली केले. मात्र, मोदी सरकार आता देश विकायला निघाले आहे. त्यामुळे देश धोक्यात आल्याने केवळ सत्तेसाठी नव्हे तर देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

हे देखील पहा :

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांची गेल्या साठ वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी केलेली सेवा या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा काँग्रेस कडून आमदार कदम यांचा लोकसेवा गौरव सोहळा काल दि.९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कडेगावच्या वांगी येथील सोनहीरा साखर कारखाना परिसरात हा सोहळा पार पडला.

देश आणि संविधान वाचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचावे
Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना

याप्रसंगी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस पक्षाने पंच्याहत्तर वर्षात देश बलशाली करण्याचं काम केलं. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील लोकं देश विकायला निघाले आहेत. त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आज देश आणि संविधान धोक्यात आले आहे.

त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता आली पाहिजे, आणि ही सत्ता देश वाचवण्यासाठी असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार कश्याप्रकारे देश विकायला निघालेले आहे हे तळागाळात जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवले पाहिजे व याची जाणीव करून दिली पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com