
नाशिक: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज नाशकात आहेत. सोबतच आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणाही सुरु आहे. राऊतांनी आज भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. राज्यात धार्मिक तणाव निर्माण करुन भाजपला राज्यात राष्ट्रपती शासन लावायचे आहे असा गंभीर आरोप करत राज्यात दंगली (Riots) घडवण्याचं कास्थान असून याचे इंटेलिजन्सकडे इनपुट आहेत असा दावाही संजय राऊतांनी केला आहे. (Conspiracy to cause riots in the state; Inputs to Intelligence: Sanjay Raut)
हे देखील पहा -
राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, नाशिक (Nashik) रामाची पवित्र भूमी आहे. पण काही लोक हनुमान चालीसा पठण करायला पुण्यात पोहचलेत, काही मातोश्रीवर पोहचले. ज्यांनी भाड्याने हिंदुत्व घेतलंय, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला त्यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे. तसेच भोंगे, हनुमान चालीसाच्या मुद्द्यांवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले, आता हिमालयात कोण जातंय हे पाहुयात असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.
बाळासाहेबानी हिंदुत्वाची सुरुवात केली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. भोंग्याचं राजकारण आजच संपलंय. यावेळी रामनवमीला 10 राज्यात दंगली घडल्या. ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात अशा मुद्द्यांवर दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर संपला. हनुमान चालीसाची पहिली दोन कडवेही यांना पाठ नसतील. तथाकथित हनुमान भक्तांनी कॅमेरासमोर हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असं आवाहन त्यांनी भाजप नेत्यांना केलं, तसेच राष्ट्रगीत यांना येत नाही. महाराष्ट्रात सत्ता येत नाही, म्हणून भाजप नैराश्याने ग्रासला आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
राज ठाकरेंबाबत राऊत म्हणाले की, नव हिंदू ओवैसी यांच्यामार्फत राज्यात दंगली घडवण्याचं कारस्थान आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न सांगून राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं म्हणत राज्यात दंगली घडवण्याचं कारस्थान असून याचे इंटेलिजन्सकडे इनपुट आहेत असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.