महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास

उस्मानाबाद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला PSI मनीषा गिरी यांना ४ माजली इमारतीवरून ढकलून देण्यात आले होते. हा प्रकार 15 मे 2019 रोजी घडला होता.
महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास
महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावासकैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) मनीषा गिरी यांना चार मजली इमारती वरून ढकलून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्याचे हवालदार तथा पोलीस गाडी चालक आशिष ढाकणे याला सात वर्ष कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

हे देखील पहा -

शहरातील उस्मानाबाद बीड रस्त्यालगत असलेल्या चार मजली इमारतीमध्ये मनीषा गिरी राहत होत्या. या इमारती वरून मनीषा गिरी खाली पडल्या असल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार 15 मे 2019 रोजी सकाळी सहा वाजता घडला होता.

महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास
तासगावमध्ये थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आनंद नगर पोलिस ठाण्यातील हवालदार तथा चालक आशिष ढाकणे यानेच PSI मनीषा गिरी यांना ढकलून दिल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये न्यायालयाने गिरी यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ढाकणे याला सात वर्षे कारावास व 25 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com