Bhandara Balaghat National Highway : भंडारा- बालाघाट रस्त्याला महूर्त सापडेना

मंत्री नितीन गडकरींनी केली हाेती घाेषणा.
Bhandara Balaghat National Highway
Bhandara Balaghat National Highwaysaam tv

Bhandara : भंडारा (bhandara) जिल्ह्यातुन जाणाऱ्या भंडारा- बालाघाट (bhandara balaghat) राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची घोषणा झाली. परंतु महामार्ग प्रशासनाला अद्याप हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग नियमानुसार तयार करण्याचा महूर्त सापडला नाही.

Bhandara Balaghat National Highway
HSC Exam : बारावीच्या परीक्षेत 'हायटेक' कॉपी ! 'या' जिल्ह्यातील सहा शिक्षकांना अटक

हा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाताे. मात्र अद्यापही विकासापासून उपेक्षित राहला आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी या राज्य मार्गाला राष्ट्रीय मार्ग तयार करण्याच्या घोषणेचा महामार्ग प्रशासनाला विसर तर पडला नाही ना असा प्रश्न भंडाराकरांना पडला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी भंडारा ते बालाघाट या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग (Bhandara Balaghat National Highway) म्हणून घोषित केले. हा महामार्ग सिमेंट काँक्रीटचा रस्ता असणार आहे. हा महामार्ग झाल्यास महाराष्ट्रातून कमी वेळात मध्यप्रदेशात जाणे शक्य होणार आहे.

Bhandara Balaghat National Highway
Naxal : नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद, एक जखमी; महाराष्ट्र अलर्ट

तसेच मॅग्निज वाहतुकीसाठीही सोईचे होणार आहे. परंतु आता बांधकामाला का सुरुवात झाली नाही असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या रस्त्याच्या प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच रुंदीने रस्ता कमी असल्याने वाहतूक संथ गतीने होत आहे. निमुळत्या रस्त्याने अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे लवकर रस्त्याचे काम सूरु करावे अशी मागणी भंडाराकर करीत आहेत.

दूसरीकड़े याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता भंडारा- बालाघाट रोड 30 वर्षापासून भंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहे. या राज्य मार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रिय महामार्ग प्रशासनाला हस्तांतरण करण्याचे सर्व सोपस्कार पार पाडलेत. (Maharashtra News)

Bhandara Balaghat National Highway
HSC Exam 2023 : महाराष्ट्राची काॅपी जत्रा... बारावीच्या विद्यार्थ्यांना 'या' परीक्षा केंद्रावर काॅपीचे झाले वाटप (पाहा व्हिडिओ)

अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने आपल्या ताब्यात रस्ता घेतला नाही. तर दुसरीकड़े या रस्त्याचे उपग्रेडिंगचे काम खर्चिक असल्याने सार्वजिनक बांधकाम विभागाकड़े तितका खर्चिक निधि नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com