'24 तासात कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त'; एसटी महामंडळाची कामगारांना नोटीस

विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही.
'24 तासात कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त'; एसटी महामंडळाची कामगारांना नोटीस
'24 तासात कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त'; एसटी महामंडळाची कामगारांना नोटीस Saam Tv

मुंबई : राज्यात एसटी संपाचा तिढा आजून देखील सुटायला तयार नाही. विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आणखी काही बस सुरु झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रोजंदारीवर एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

यानुसार २४ तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी या बैठकीमध्ये घेतले आहे. यामुळे संपाचा तिढा सुटण्याऐवजी उलट वाढला आहे. दुसरीकडे संप मागे घेण्याचे आवाहन परत एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. दरम्यान, रोजंदारीवर एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

'24 तासात कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त'; एसटी महामंडळाची कामगारांना नोटीस
दिवाळीनंतर भाजीपाला झाला स्वस्त

२४ तासामध्ये कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई होणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. ३५० रोजंदारीवर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यात सध्या सुमारे २ हजार रोजंदारीवर कर्मचारी असून यामध्ये चालक, वाहक याचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.