इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

संभाजी भिडे सध्या पुण्यातील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSaam Tv

पुणे - आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी हिंदु मुस्लिम धर्मांत तेड निर्माण करणारे व्यक्तव्य केले आहे. इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू असल्याचे वक्तव्य करत हिंदू समाजाने इस्लामला तितक्यात पोटतिडकीने प्रतिउत्तर दिले पाहिजे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे सध्या पुण्यातील (Pune) शिरुर (Shirur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

हे देखील पहा -

यावेळी त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी इस्लाम धर्माला लक्ष्य केले. आता हिंदू समाजानेही तितक्याच पोटतिडकीने इस्लामला प्रत्युत्तर दिले पाहिजे. संभाजी महाराजांशी शत्रुत्त्व होतं म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करून मारले नाही तर यामागे इस्लाम धर्माविषयी औरंगजेबाच्या मनात असलेली पोटतिडीक कारणीभूत होती.

Sambhaji Bhide
Weather Alert: कडाक्याचा उन्हाळा करणार हैराण; 8 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

औरंगजेबाच्या मनातील इच्छा वेगळीच होती. औरंगजेबला संपूर्ण भारताचे तुकडे-तुकडे करायचे होते. याच रागातून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले. संभाजी महाराज किंवा औरंगजेब नाहीत. पणऔरंगजेब अजूनही बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या रुपाने अस्तित्त्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहेअसे संभाजी भिडे यावेळी म्हणाले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार किंवा पोलीस संभाजी भिडे यांच्यावर काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com