वादग्रस्त खालेद तलाठी दुसऱ्यांदा निलंबीत, उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी ही कारवाई केली आहे.
वादग्रस्त खालेद तलाठी दुसऱ्यांदा निलंबीत, उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई
वादग्रस्त खालेद तलाठी दुसऱ्यांदा निलंबीत, उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाईलक्ष्मण सोळुंके

जालना - वादग्रस्त खालेद तलाठी उर्फ के.के. सय्यद याला अखेर निलंबीत करण्यात आले आहे. त्याला निलंबित करण्याची ही दुसरी वेळ आहे. जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी ही कारवाई Action केली आहे. कार्यालयीन बैठकांना हजर न राहणे, कामात हलगर्जीपणा करणे या कारणावरून खालेद याला निलंबीत करण्याचा प्रस्ताव बदनापूरच्या तहसीलदारांनी जालन्याच्या Jalna उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवला होता. 

हे देखील पहा -

कारणे दाखवा नोटीस देऊनही त्याने उत्तर न दिल्याने त्याला अखेर निलंबीत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अंबड तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सापळा रचून एका दुचाकीचालकाला लैंगिक शक्तिवर्धक औषधांच्या साठ्यासह ताब्यात घेतले होते. या प्रकरणात तलाठी खालेद याची ऑडीओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने खालेद तलाठी या गोळ्यांचा पुरवठा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवत असल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com