Hingoli News: आमदार संतोष बांगरांचा ताफा गावाबाहेरच अडवला, ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंग मसाई येथे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा ताफा अडवला.
Santosh Bangar
Santosh BangarSaam TV

>> संदीप नागरे

हिंगोली : ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं गेल्या काही महिन्यात अनेकदा पाहिलं गेलं. आज पुन्हा एकाद हिंगोलीत शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची माहिती मिळत आहे. यावेळी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना गावकऱ्यांनी गावात प्रवेश देखील दिला नाही.

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंग मसाई येथे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा ताफा अडवला. गावातील यात्रेत राजकीय पुढार्‍यांची एन्ट्री नको म्हणत आमदार बांगर यांना यात्रेत जाण्यापासून रोखले गेले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटला आहे.

Santosh Bangar
Sanjay Raut: पुन्हा राजकारण तापणार! संजय राऊतांची जिभ घसरली, भाजपा नेत्यांना म्हणाले; 'हा अपमान सहन करणारे सर्व....'

गावच्या यात्रेत राजकारण कशाला म्हणत शिंदे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. गावात भरलेल्या यात्रेत राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना प्रवेश दिल्याने हा वाद झाला. शेकडो वर्षांपासून ही यात्रा या गावांमध्ये भरते. यात्रेनिमित्त या गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे सहभागी होत असतात. (Latest Marathi News)

मात्र यावर्षी शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांना यात्रेचे निमंत्रण देत यात्रेत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित रहावे असा आग्रह केला. मात्र याला वारंगामसाई गावातील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत संतोष बांगर यांना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह गावच्या वेशीवरच आडवले होते.

Santosh Bangar
Jalgaon Accident News: पादचारीला ट्रॅक्‍टरची धडक; अंगावरून चाक गेल्‍याने मृत्‍यू

यावेळी आमच्या गावात भरलेली यात्रा ही सर्व धर्मीय आहे. इथे राजकारण करू नका म्हणत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमदार बांगर यांना यात्रेत जाण्यासाठी रोखले. मात्र पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आणि आमदार बांगर यांना दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com