Chandrapur News:स्वयंपाक तेलंगणात आणि जेवण महाराष्ट्रात...; एका घराची अजब कहाणी

स्वयंपाक घराच्या खोल्या महाराष्ट्रात गेल्या आहेत.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam TV

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात एक घर असं आहे, ज्याचं स्वयंपाक घर तेलंगणात, तर बैठक खोली महाराष्ट्रात. ऐकून नवल वाटलं ना?..पण हे शंभर टक्के खरं आहे. हे घर चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्यात येणाऱ्या महाराजगुडा इथे आहे. दहा खोल्यांच्या या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. (Latest Marathi News)

चंद्रपूरमधील (Chandrapur) जिवती तालुक्यातील १४ गावं सीमा वादात आहेत. या गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार आपला अधिकार सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती,शाळा, (School) कल्याणकारी योजना, अंगणवाडी आणि रुग्णालये आहेत. इतकेच नाही तर या ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान देखील करतात.

महाराजगुडा हे गाव सीमावादात अडकलेल्या गावांपैकी एक आहे. या गावावर तेलंगणा सरकारने आपला हक्क सांगितला आहे. तेलंगणा राज्याची सीमा निश्चित केली जात आहे. यात सीम गावाच्या मधोमध आहे. त्यामुळे गावाची विभागणी दोन राज्यांमध्ये झाली आहे. तेलंगणा सरकारने राज्याची सीमा निश्चित केली आहे. ही सीमा गावाचा मध्यभागातून गेली आहे. त्यामुळं गाव दोन राज्यात विभागले गेले आहे. अर्ध गाव महाराष्ट्रात तर अर्ध गाव तेलंगणात आहे.

Chandrapur News
Chandrapur News: छेडछाड करणाऱ्या मजनूला चोप; व्‍हीडीओ झाला व्‍हायरल

यामुळे फक्त गाव नाही तर एका घराचीही विभागणी झाली आहे. या घरात १० खोल्या आहेत. त्यापैकी काही खोल्या बैठकीच्या आणि किचनसाठी चार खोल्या आहेत. अशात यातील स्वयंपाक घराच्या खोल्या महाराष्ट्रात गेल्या आहेत. तर बैठक खोल्या तेलंगणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जेवण बनवायचे आणि तेलंगणामध्ये रहायचे अशी नवलाई पाहून सगळीकडे या घराती चर्चा सुरू आहे.

Chandrapur News
Chandrapur News : न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने घेतला गळफास; धक्कादायक घटनेनं खळबळ

उत्तम देवसिंग पवार आणि चंदू देवसिंग पवार या दोन भावांचे हे घर आहे. यात दहा खोल्या असून एकूण अकरा सदस्य राहतात. तेलंगणा सरकारने जी सीमा निश्चित केली, त्यानुसार तेलंगणात चार खोल्या गेल्या आहेत आणि उर्वरित बैठक खोल्या महाराष्ट्रात आहेत. सीमा वादाच्या या गोंधळात पवार, यांचा कल तेलंगणात समावीष्ट होण्याचा आहे. तेलंगणा सरकारने अनेक विकास कामे केली आहेत, तसेच विविध योजनांचा लाभ येथील अनेक कुटुंबांना झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com