राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला; दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी वाढ

Corona Cases in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
Corona News Updates
Corona News UpdatesSaam Tv

मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या (Corona Cases in Maharashtra) पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. रविवारी (१ मे) राज्यात कोरोनाचे १६९ नवे रुग्ण (Corona News Cases) आढळून आले आहेत. तर, यादरम्यान, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे.

Corona News Updates
देशात टेन्शन वाढले! अवघ्या २४ तासांत 3324 नवीन कोरोनाबाधित रुग्ण

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात आतापर्यंत ७७,२९, ०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत ८,०२,१२, ३१० रुग्णांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या राज्यात कोरोनाचे ९९५ सक्रिय रुग्ण आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती आहे. मुंबईत ६२८ सक्रिय रुग्ण आहे. त्यापाठोपाठ पुण्यात २०९ तर ठाण्यात ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं राज्य सरकारनं निर्बंध हटवले. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं राज्याची चिंता वाढली आहे.

Corona News Updates
या 27 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू; लग्न आणि अंत्यसंस्कारावर बंदी

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेऊ असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com