घरीच रहा, सुरक्षित रहा; आपल्याला काेराेनाची साखळी ताेडायची आहे!
sangli lockdown officers on field

घरीच रहा, सुरक्षित रहा; आपल्याला काेराेनाची साखळी ताेडायची आहे!

सांगली : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवा देणा-यांनी घरपाेच सेवा द्यावी. आपल्याला सर्वांना मिळून काेराेनाला राेखायचे आहे असे आवाहन सांगलीच्या बाजारपेठेसह विविध ठिकाणी जाऊन सहायक आयुक्त अशोक कुंभार sangli lockdown officers on field करीत आहेत. काेराेना रुग्णांची संख्या वाढल्याने सांगलीत 19 जूलैपर्यंत लाॅकडाउनमधील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. (corona-patient-increased-sangli-lockdown-officers-on-field)

या निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर सहायक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षकांचे पथक रस्त्यावर उतरले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी होम डिलिव्हरी देण्याचे आवाहन करीत आहेत.

सहायक आयुक्त अशोक कुंभार हे पथकासह बाजारपेठेत फिरत आहेत. नव्या निर्बंधांनुसार रस्त्यावर किरकाेळ वस्तु विक्री करणा-या हातगाड्या लावण्यास पथकाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ भाजी मंडईतच भाजी विक्रीस परवानगी देण्यात येत आहे. भाजी मंडई वगळता अन्य कोठेही भाजी विक्री करताना काेणी आढळले तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे अशा स्पष्ट सूचना पथकाकडून देण्यात येत आहेत.

याबराेबर रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडेही बंद ठेवण्यात आले आहेत. पहाटेपासून नव्या निर्बंधांचे उल्लंघन होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून महापालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी यांच्या आदेशान्वये कडक अंमलबजावणी केली जात आहे.

रस्त्यावर कोणीही कसल्याही प्रकारचे हातगाडी किंवा अन्य स्टाॅल लावू नयेत तसेच अत्यावश्यक अस्थापनांनी घरपोच सेवा द्यावी अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा ध्वनीक्षेपकावरुन देण्यात येत आहे.

sangli lockdown officers on field
सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह काेयना पाणलाेट क्षेत्रात पावसाचा जाेर

पाेलिसांनी देखील निर्बंधाच्या अनुषंगाने आज सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सक्त ताकीद दिली. अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com