कोरोना रुग्णाने डॉक्टरच्याच डोक्यात घातले सलाईनचे स्टँड...(पहा व्हिडीओ)

रुग्णाने हल्ला केल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना
कोरोना रुग्णाने डॉक्टरच्याच डोक्यात घातले सलाईनचे स्टँड...(पहा व्हिडीओ)
कोरोना रुग्णाने डॉक्टरच्याच डोक्यात घातले सलाईनचे स्टँड...(पहा व्हिडीओ)राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाबाबत काही अघटित घडले की नातेवाईक अनेकदा डॉक्टरवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. मात्र रुग्णाने हल्ला केल्याची घटना कधी ऐकली आहे का ? आज 14 जुलै रोजी मध्यरात्री साडेचारच्या सुमारास अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिडं सेंटरमध्ये घडली आहे. Corona patient puts saline stand in doctor's head

आयसीयू कोव्हिडं सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या लोणारे येथील 55 वर्षीय रुग्णाने रात्रपाळीत असलेल्या डॉ स्वप्नदीप थळे याच्यावर सलाईन स्टँडने कपाळावर हल्ला केला. यात थळे याच्या डोळ्याला जखम झाली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील रुग्ण याना कोरोनाची लागण झाली असल्याने ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोव्हिडं सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेले हे रुग्ण एकसारखे आपले मास्क काढत होते. याबाबत डॉक्टर, परिचारिका हे वारंवार मास्क लावण्याबाबत सांगत होते. मात्र त्याकडे ते दुर्लक्ष करीत होते. त्यानंतर आयसीयूत एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने डॉ स्वप्नदीप थळे आणि परिचारिका हे व्यस्त झाले होते. चार वाजेपर्यत सर्व काम आटोपून डॉ स्वप्नदीप थळे हे सेंटरमध्ये आराम करीत होते.

डॉ थळे हे टेबलवर आराम करीत बसले असताना रुग्णाने बाजूचा सलाईन स्टँड हातात घेऊन येऊन अचानक थळे याच्या चेहऱ्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्याने डॉ थळे भांबावले. अशा परिस्थितीत त्यांनी बाजूची प्लास्टिक खुर्ची उचलून दुसरा होणारा हल्ला वाचविला. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णाला पकडले. रुग्णाने केलेल्या हल्ल्यात सलाईन स्टँड हा पूर्ण वाकला आहे.

कोरोना रुग्णाने डॉक्टरच्याच डोक्यात घातले सलाईनचे स्टँड...(पहा व्हिडीओ)
पेट्रोलनंतर सीएनजी आणि गॅसही महागला; जाणून घ्या दर !

डॉ थळे याच्या कपाळावर जोरदार हल्ला झाल्याने त्याच्या डाव्या डोळ्याला जखम होऊन दिसेनासे झाले आहे. त्यानंतर डॉ थळे यांना त्वरित आयसीयूत दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून हळूहळू अस्पष्ट दिसू लागले आहे. या हल्याबाबत रुग्णाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला का केला याबाबत रुग्णाला विचारले असता मला काहीच कळलं नाही असे तो बोलत आहे. मात्र डॉक्टरांवर होत असलेले या हल्ल्यामुळे डॉक्टरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com