कोरोनाच्या दोन्ही लाटेत नगरमधील तेरा गावे होती निर्धास्त

कोरोनाच्या दोन्ही लाटेत नगरमधील तेरा गावे होती निर्धास्त
नांदेड जिल्ह्यात कोरोना तपासणी

नगर ः कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला; मात्र जिल्ह्यातील १३ गावे दोन्ही लाटांत निर्धास्त होती. या गावांनी वेशीवरच कोरोनाला रोखल्याची बाब आता पुढे आली आहे.

मार्च २०२०पासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला होता. आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार २३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यांतील दोन लाख ७५ हजार ३०६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात पाच हजार ९७५ जणांचा मृत्यू झाला. (Corona patients were not found in thirteen villages in the Nagar district)

नांदेड जिल्ह्यात कोरोना तपासणी
पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी दिसत असला, तरी बाधितांचा आकडा रोजच कमी-जास्त होत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील परिस्थितीची आढावा घेण्यास सुरवात केली आहे. आढावा घेतला जात असताना एक आनंददायक बाब समोर आली.

जिल्ह्यात एक हजार ५९६ गावे असून, एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत. या सर्वच गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत असली, तरी जिल्ह्यातील एक हजार ५८३ गावांत कोरोनाने आतापर्यंत शिरकाव केला आहे. जिल्ह्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५८ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. दुसरी लाट मात्र गंभीर ठरली. त्यात पहिल्या लाटेतून सुटलेल्या गावांमध्येही कोरोनाने शिरकाव केला असला, तरी १३ गावांमध्ये अद्यापही कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. या तेरा गावांनी नेमक्या काय उपाययोजना केल्या, याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील इतर गावांमध्ये करणे यामुळे गरजेचे बनले आहे. (Corona patients were not found in thirteen villages in the Nagar district)

कोरोनाचा शिरकाव न झालेली गावे

अकोले ः जायनावाडी, बिताका, शिवाजीनगर, पोपेरेवाडी, कोलटेंभे. नेवासे ः म्हाळापूर, चिंचबन. शेवगाव ः घेवरी, देवळाणे, ढोरहिंगणी, मलकापूर, शहापूर. जामखेड ः आपटी.

जिल्ह्यात प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याबरोबरच ‘हिवरेबाजार पॅटर्न’चा अवलंब केला जात आहे. कोरोनाचा शिरकाव न झालेल्या १३ गावांमधील उपाययोजनांचेही अनुकरण इतर गावांनी करणे गरजेचे आहे.

- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com