कोरोना काळात पॅरोलवर सोडलेले कैदी बेपत्ता; ८९२ जणांचा शोध सुरू

या प्रकरणी आतापर्यंत ८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Corona Virus Prisoners jail
Corona Virus Prisoners jail Saam Tv

मुंबई : कोरोना (Corona) संकटात राज्यातील हजारो कैद्यांना (Prisoners) पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. या कैद्यांपैकी जवळपास ८९२ कैदी बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या बेपत्ता कैद्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिस आता विशेष मोहिम राबणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील ४६ तुरुंगातील चार हजार २४१ कैद्यांना अभिवचन (पॅरोल) व संचित (फर्लो) रजेवर सोडण्यात आले होते.

Corona Virus Prisoners jail
भयंकर ! पोलीस हवालदाराला कार चालकाने बोनेटवरुन फरफटत नेले, त्यानंतर...

यापैकी ८९२ कैदी तुरुंगात परतण्यास पुरेसा वेळ देऊनही ते परतले नाहीत. यापैकी अनेक जण हत्या, हत्येचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशातील तुरुंगातील अत्यंत गर्दीच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये राज्यांना आपत्कालीन कारणास्तव कैद्यांना सोडण्याचे निर्देश दिले होते. यानंतर राज्य सरकारने अभिवचन व संचित नियमांतर्गत ४५ दिवसांसाठी किंवा अधिसूचना मागे घेईपर्यंत, त्या कैद्यांना आपत्कालीन अभिवचन रजेवर सोडण्याची परवानगी देण्यासाठी अधिसूचना जारी केली.

सोडण्यात आलेल्या कैद्यांमध्ये फक्त दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे सिंडिकेट, मनी लाँड्रिंग इत्यादी आरोपींना मात्र या तरतुदी लागू नव्हत्या. दरम्यान, १ एप्रिल २०२२ रोजी, महाराष्ट्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध मागे घेतले. त्यानंतर ४ मे रोजी राज्याच्या गृह विभागाने महामारीच्या काळात दोषींना तात्पुरता अभिवचन रजेबाबत आदेश जारी केला.

Corona Virus Prisoners jail
धक्कादायक! एका महिलेसह २४ कैद्यांना HIV ने गाठलं; कारागृह प्रशासन हादरलं

या आदेशात सर्व दोषी कैद्यांना ४५ दिवस किंवा त्यानंतरचे अतिरिक्त ३० दिवस पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत तुरुंगात परतण्याचे निर्देश दिले होते. आत्मसमर्पण कालावधी संपल्यानंतर तुरुंगात परत न आलेल्या लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २२४ (कायदेशीर कोठडीला विरोध करणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचेही गृह विभागाने तुरुंग विभागाला स्पष्टपणे निर्देश दिले.या आदेशानंतर कारागृह विभागाने तातडीच्या अभिवचन रजेचा लाभ घेतलेल्या सर्व कैद्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.

यामध्ये तीन हजार ३४० कैदी वेळेत परत कारागृहात परतले आणि जे पुरेसा वेळ देऊनही परत येऊ शकले नाहीत, त्यांना संबंधित पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. स्थानिक पोलिसांच्याही संपर्कात नसलेल्या कैद्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली. दोषींना आत्मसमर्पण करण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही तुरुंगात परत न आल्याने आतापर्यंत ८६ गुन्हे दाखल केले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com