विद्यार्थ्यांनी बनवला कोरोना प्रतिबंधात्मक रोबोट

उस्मानाबाद मधील इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संसर्ग टाळण्यासाठी चा रोबोट
विद्यार्थ्यांनी बनवला कोरोना प्रतिबंधात्मक रोबोट
विद्यार्थ्यांनी बनवला कोरोना प्रतिबंधात्मक रोबोटकैलास चौधरी

उस्मानाबाद : मागील २ वर्षापासून भारतासह India संपूर्ण जगात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. हा संसर्ग Infection रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आतापर्यंत यात कोणालाही यश आलेलं नाही. उस्मानाबाद Osmanabad मधील इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संसर्ग टाळण्यासाठी चा रोबोट बनवला आहे. कोरोना विषाणूमुळे मानवाची संपूर्ण जीवनशैलीच बदलून गेली आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा Mask वापर आणि सॅनिटायझर Sanitizer हे आवश्यक झाले आहे. वारंवार हात स्वच्छ करणे ही सवय लावून घेण्यासाठी उस्मानाबाद येथील तेरणा Terna अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी students 20 हजार रुपयात एक रोबोट Robot बनवला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा रोबोट बनवला आहे. प्रोजेक्टचा एक भाग म्हणून, चक्क कोरोना प्रतिबंधात्मक काम करणारा रोबोट तयार करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

सध्याच्या परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा मिस मास्की Miss Maskey नावाचा रोबोट विद्यार्थ्यांनी बनविला आहे. हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर तो बारीक लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो. तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा तो दाखवतो. यामुळे कोरोना संसर्गाचा पुढील संभाव्य धोका टळू शकतो.

तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून, त्याबरोबर प्रत्येकाचे स्वागत देखील सॅनिटायझर देवून करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच सार्वजनिक ठिकाणी, मॉल, मल्टीप्लेक्स, रूग्णालयात फायदेशीर ठरणार आहे. उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात स्थानिक (स्वदेशी) वस्तूपासून (पार्ट) हा रोबोट तयार केला आहे.

विद्यार्थ्यांनी बनवला कोरोना प्रतिबंधात्मक रोबोट
बीड नगरपालिकेकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप

ग्रामीण भागात सुद्धा या महाविद्यालयाने वेळोवेळी चांगली संधी देऊन, विद्यार्थ्यांन मधील कौशल्यास वाव दिला आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तंत्र कौशल्य वापरून, उस्मानाबाद सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या आकांक्षीत जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाच्या सहाय्याने शिक्षण दिले आहे. जागतिक महामारी पासून रोखण्यासाठी विदयार्थ्यानी तयार केलेला हा रोबोट आहे. येणाऱ्या काळात मॉल, चित्रपटगृह, शाळा, महाविद्यालय किंवा व्यापारी आस्थापनांच्या प्रवेशदवारात बसवल्यास आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com