अमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

सध्या देशात ‘ओमिक्रॉन’ ची (Omicron Variant) प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
अमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
अमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह Saam Tv

अमरावती : सध्या देशात ‘ओमिक्रॉन’ ची (Omicron Variant) प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या देशात, राज्यात, शहरातही कोरोनाबाबत (Coronavirus) पुन्हा एकदा काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अमरावती शहरात कोरोनाची साथ हि पूर्णता आटोक्यात आली होती. मात्र आज शहरात कोरोनाचे पुन्हा नऊ रुग्ण नव्याने आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात आज नवीन नऊ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी ५ पुरुष असून चार महिला आहेत हे सर्व रुग्ण अमरावती शहरातीलच रहिवासी आहेत, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ९६ हजार १९२ एवढी झाली असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
गोसिखुर्द धरणाच्या कारभारामुळे भंडाऱ्यात 'क्रुत्रीम महापूर'?

सद्या सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काही महिन्यांपूर्वीच जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. मात्र आता पुन्हा तिसरी लाट येऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळेच विदेशातून देशात, शहरात येणाऱ्यांवर प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. कोरोनाच्या टेस्टिंग व लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे, तर गेल्या कित्येक दिवसांपासून अमरावती शहरात कोरोना नियंत्रणात असला तरी त्याच्या उद्रेक व्हायला किंचितही वेळ लागणार नाही. शहरात अनेक नागरिक बिना मास्क फिरतांना आढळून येत आहे, अश्या नागरिकांवर सध्या जिल्ह्यात कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिक बिनधास्त आहेत.

जिल्हा प्रशासनाने विविध नियम लागू केले आहेत. मास्कविना कार्यालयात प्रवेश नाही. परिसरात विनामास्क आढळून आल्यास दंड करण्यात येईल, असे फलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आले आहे. दंड आकारण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. मात्र त्याच्या काही एक उपयोग होतांना दिसून येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातच निवेदन देणारे, कामानिमित्त येणारे अनेक नागरिक बिना मास्क थेट कार्यालयात प्रवेश करतात.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.