राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसर

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे धुळे दौऱ्यावर होते.
राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसर
राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसरभूषण अहिरे

धुळे -  नगरमध्ये अद्यापही कोरोनाचा Corona प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी नगर मधील बहुतांश गाव सील करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. अस असतांना दुसरीकडे मात्र राज्याच्या मंत्र्यांनाच कोरोनाच भान राहत नसल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा -

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे धुळे दौऱ्यावर होते. यादरम्यान मंत्री सत्तार यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेल्या उमेदवारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना कोरोनाचा विसर पडल्याचे बघावयास मिळाले.

राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसर
धुळ्यात 100 क्विंटल कांदा चोरीला !; पाहा व्हिडीओ

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या कुणालाही कोरोनाच भान राहिल नसल्याच दिसून आले. मंचावर बसलेल्या एकाच्याही तोंडाला मास्क नसल्याचे देखील यावेळी दिसून आले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु दुसरीकडे मात्र राज्य सरकार मधील मंत्र्यांनाच त्याचं भान राहिलं नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढणार नाही असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.