पंढरपुरात भाविकांची कोरोना चाचणी मोहीम सुरू..

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे . त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहरातील विविध पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.
पंढरपुरात भाविकांची कोरोना चाचणी मोहीम सुरू..
पंढरपुरात भाविकांची कोरोना चाचणी मोहीम सुरू..भारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात Pandharpur येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे . त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहरातील विविध पाच ठिकाणी कोरोना Corona चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. Corona test campaign of devotees started in Pandharpur

यावर्षी कोरोनामुळे आषाढी पालखी सोहळा व यात्रा रद्द करण्यात आले आहे. पंढरपूर शहरात यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी 17 ते 25 जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या काळात भाविकांना पंढरपूर शहरात येण्यास बंदी राहणार आहे.

हे देखील पहा-

त्यापूर्वीच भाविकांची पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी पंढरपूर नगरपालिकेने मंदिर परिसर, चंद्रभागा नदी, बस स्थानक, विसावा, वाखरी या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. दोन दिवसांमध्ये सुमारे 1500 भाविकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ चार ते पाच लोकांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.

पंढरपुरात भाविकांची कोरोना चाचणी मोहीम सुरू..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या वाहनाचा अपघात

कोरोना चाचणी मोहीम आषाढी यात्रे पर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com