विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीभारत नागणे

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. Corona test of 145 employees of Vitthal-Rukmini temple

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला काही मोजके पुजारी व मंदिर समितीच्या सदस्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान कोरोनाचा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी मंदिर समितीने कोरोनाचे सर्व नियम पाळून काही निर्बंध घातले आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
चालकाचा ताबा सुटला; स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरचा विचित्र अपघात !

याचाच एक भाग म्हणून मंदिरातील सर्व 145 कर्मचाऱ्यांसह अधिकारी व मंदिर समितीच्या सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या पुजारी, कर्मचारी व मंदिर समिती सदस्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com