सर्व व्यापाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने वातावरण पॉझिटिव्ह

सर्व व्यापाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने वातावरण पॉझिटिव्ह
Corona Test Kit

केशव चेमटे

भाळवणी ः मागील काही दिवसांपासून भाळवणीत (ता. पारनेर) कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आठ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी रॅपिड टेस्ट केल्याने देवरे यांनी सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने बाजारपेठ पुन्हा खुली झाली आहे. परिणामी सर्वत्र वातावरण सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

तहसीलदार देवरे यांची गावात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी निवेदन देऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावर देवरे यांनी नियमांचे पालन केल्यास व सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर सायंकाळी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. Corona test of merchants in Bhalwani is negative

Corona Test Kit
लग्नकल्लोळ! सुहागरात्री बाहेरून कडी लावून पळालेल्या वधूला अटक

आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळजवळ १०० ते १५० व्यापाऱ्यांनी कोरोना रॕपिड टेस्ट करून घेतली. चाचणीत सर्वच व्यापाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. परवानगी नंतर आज (मंगळवार) दुकाने सायंकाळी चार वाजेर्यंत व्यवहार सुरू होते.

गावातील व्यापाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. यावेळी अशोक रोहोकले, अविनाश राऊत, निशिकांत रोहोकले, दीपक रोहोकले, संदीप चेमटे, संतोष चेमटे आदींनी नियमावली तयार करून ती काटेकोरपणे पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले.Corona test of merchants in Bhalwani is negative

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com