Corona Update: लहान मुलांमधील कोरोना संक्रमण चिंतेचा विषय, काय काळजी घ्यावी, डॉक्टर काय सांगतात?

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता लहान मुलांचीही त्यात संख्या वाढत चाललीये.
Corona Update: लहान मुलांमधील कोरोना संक्रमण चिंतेचा विषय, काय काळजी घ्यावी, डॉक्टर काय सांगतात?
Corona UpdateSaam Tv

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता लहान मुलांचीही त्यात संख्या वाढत चाललीये. लहान मुलांमधील कोरोना संक्रमण हा चिंतेचा विषय झाला आहे. राज्यभरात लहान मुलांमध्ये हे संक्रमण सुरुये. औरंगाबादचा विचार करता गेल्या आठवड्याभरात 0 ते 6 वयोगटातील 18 मुलं कोरोनाबाधित झाले आहेत. तर 6 ते 15 वयोगटातील 150 वर मुलं बाधित झाले आहे. त्यामुळं लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात (Corona update infection in children how to take care them what doctor says).

 Corona Update
India Corona Update: कोरोनाचा उद्रेक कायम, 24 तासात 2,68,833 नवे रुग्ण

ताप 102 पेक्षा जास्त सलग असणे, सर्दी-खोकला असणे, जेवण न करणे, सतत ग्लानीत असणे असली लक्षण असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेच असल्याचं डॉक्टर सांगतात. सोबतच न घाबरता काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात. नक्की काय काळजी घ्यावी, बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे काय सांगतात जाणून घेऊया -

ओमिक्रॉन (Omicron) बाधित 80 टक्के रुग्णांना सर्दी पडसे होते, 10 टक्के रुग्णांना थंडी वाजून ताप येतो, तर 10 टक्के रुग्णांना जुलाब, उलट्या आणि थकवा अशी लक्षणं दिसतात.

ओमिक्रॉनची लहान मुलांमध्ये ठळकपणे दिसणारी लक्षणं म्हणजे ताप, सर्दी, पडसं, अंगदुखी, घशात खवखव, उलटी जुलाब, लघवी कमी होणे, थकवा आहेत.

ओमिक्रॉनवरील काही उपचार -

- त्याला 7 दिवस विलगीकरणात ठेवावे. मुलासोबत राहणाऱ्या व्यक्तीने पूर्ण वेळ मास्क घालूनच रहावे.

- डॉक्टरांनी दिलेली औषधं मुलाला वेळेवर द्यावीत

- साधे पाणी, नारळ पाणी, फळांचा रस, ओआरएस, सूप असे देत त्याला हाइड्रेटेड ठेवावे

- ताप 102 च्या वर जाऊ देऊ नये

- ताप जर 102 च्या वर जात असेल तर लगेच स्पंजिंग करावे. मात्र आता थंडीच्या दिवसांत स्पंजिंगसाठी थंड पाणी वापरू नये

- ऑक्सिजनची पातळी सतत तपासत राहावी

- ताप असेल तेव्हा मुलांना जास्त कपडे घालू नयेत

- मुलांना अशा खोलीत ठेवावं जिथं हवा खेळती असेल

- घशात खवखव होत असेल तेव्हा मीठ घातलेल्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात

- पौष्टिक आहार द्यावा

- आई वडिलांनी सतर्क रहावे, मात्र घाबरून जाऊ नये

 Corona Update
Corona Update : कोरोना टेस्टिंगबाबत माहिती पालिकेला द्यावी, लपवाछपवी रोखण्यासाठी हे नवे नियम लागू

काही लक्षणांना गांभीर्याने घेत डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा, जसं की

- तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप आहे

- ताप 102 पेक्षा जास्तच आहे

- खूप जास्त खोकला येत असेल

- जुलाब होत असतील

- श्वास घ्यायला त्रास होत असेल

- लघवीचे प्रमाण कमी झाले असेल

- ग्लानी येत असेल

- पाणी न प्याल्याने डिहाइड्रेशन होत असेल

- ऑक्सिजनची पातळी 95 पेक्षा खाली जात असेल

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com