नागपूरात लसीकरणाकडे गर्भवती महिलांची पाठ

नागपूरमध्ये आतापर्यंत केवळ ५७ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.
नागपूरात लसीकरणाकडे गर्भवती महिलांची पाठ
नागपूरात लसीकरणाकडे गर्भवती महिलांची पाठSaam tv

नागपूर - कोरोना Corona या अजरावर सध्या तरी लसीकरण Vaccination शिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोना या महाभयंकर आजाराचा धोका टाळण्यासाठी लस आवश्यक असल्याने गर्भवती महिलांच्या Pregnant Women लसीकरणाला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली. त्यानंतर १५ जुलैपासून लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु नागपूर मध्ये गर्भवती महिलांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत केवळ ५७ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. त्यामुळे आता या गर्भवतींच्या लसीकरण वाढवण्यासाठी मनपाचे आरोग्य विभाग स्त्रीरोग संघटनेची मदत घेणार आहेत.

हे देखील पहा -

सुरुवातीच्या काळात गर्भवती महिलांनी ही लस घ्यावी की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, २ जुलै २०२१ रोजी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत लसीकरणासाठी म्हन्यता देण्यात आली. त्यानुसार १५ जुलैला गर्भवती आणिस्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

नागपूरात लसीकरणाकडे गर्भवती महिलांची पाठ
कोट्यवधी रुपयांचा दगडांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जवळपास ३७००० महिलांची प्रसूती होतात. त्या दृष्टीने लसीकरणाची तयारी करण्यात आली. जास्तीत जास्त गर्भवती व स्तनदा मातांच्या लसीकरणासाठी डागा रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर रुग्णालयातही स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे कारण लसीकरणाकडे गर्भवती महिलांनी पाठ फिरवली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com