Corona Vaccination: 'या जिल्ह्यात' रात्रीही दिली जातेयं लस...

दिवसा शेत मजूर आणि मंजुरीसाठी जाणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहत असल्यामुळे प्रशासनाने रात्रीच्या वेळी लस द्यायला सुरुवात केली आहे.
Corona Vaccination: 'या जिल्ह्यात' रात्रीही दिली जातेयं लस...
Corona Vaccination: 'या जिल्ह्यात' रात्रीही दिली जातेयं लस...दिनू गावित

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीपासूनच कोरोना लसीकरणाचा टक्का कमी असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा प्रशासनासोबत संवाद साधून मार्गदर्शन केले होते, त्या अनुषंगाने आरोग्य विभागाद्वारे 'हर घर दस्तक' अभियानाची सुरुवात करून घरोघरी जाऊन लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

(Corona Vaccination: Vaccines are also given at night in Nandurbar district)

हे देखील पहा -

विशेष म्हणजे सध्याच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात शेतीची कामं सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक दिवसा शेतात कामानिमित्त जातात. शेतमजूर आणि मजुरीसाठी जाणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ग्रामीण भागात लसीकरणाचे कॅम्प आयोजन करून नागरिकांना कोरोना लसीकरण देण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेतून लसीकरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com