कोरोना योध्दा पोलिस किरण तेलंगेच्या कुटूंबियांना 60 लाखांचा धनादेश
नांदेड जिल्हा पोलिस दलातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना साठ लाखाचा धनादेश देताना एसपी शेवाळे

कोरोना योध्दा पोलिस किरण तेलंगेच्या कुटूंबियांना 60 लाखांचा धनादेश

कोरोना कालावधीत पोलिस ठाणे मुदखेड येथील पोलिस अंमलदार किरण ईरबाजी तेलंगे यांचा मृत्यू झाला होता.

नांदेड : कोरोना काळात फ्रन्ट लाईनवर काम करुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारे हात कोरोना बाधीत होऊन मृत्यू पावले. यात पोलिस विभागाचेही कर्मचारी बळी पडले. मात्र शासनाने त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडले नाही. भक्कमपणे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी राहून आर्थीक मदत केली. अशाच एका नांदेड जिल्हा पोलिस दलातील कोरोनामुळे बळी ठरलेल्या एका पोलिसाच्या कुटुंबियांना पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी शुक्रवारी (ता. नऊ) आपल्या कार्यालयात बोलावून सन्माने साठ लाखाचा धनादेश सुपूर्त केला.

कोरोना कालावधीत पोलिस ठाणे मुदखेड येथील पोलिस अंमलदार किरण ईरबाजी तेलंगे यांचा मृत्यू झाला होता. ता. 20 डिसेंबर 2020 रोजी मुदखेड पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार किरण तेलंगे (ब.नं. 2208) यांचा कोरोनाची बाधा होऊन त्यांचा उपचाराचारादरम्यान मृत्यू झाला होता. पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी पाठविलेल्या सानुग्रह अनुदानाच्या शिफारसीला मंजुर केले.

हेही वाचा - कोरोना : नांदेड जिल्ह्यात 6 लाख 23 हजार 788 ची तपासणी

शुक्रवारी (ता. नऊ) जुलै रोजी मनिषा किरण तेलंगे, त्यांची दोन मुले ऋतुराज आणि कृष्णकांत यांना प्रत्येकी 20 लाख रुपये असा एकूण 60 लाख रुपयांचा धनादेश पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांना दिला. कोरोना काळात सुध्दा आपल्या कर्तव्यात कसुर न ठेवता किरण तेलंगे यांनी आपले काम हिंमतीने केले. पण दुर्देवाने त्यांचा जीव गमवावा लागला होता. किरण तेलंगे यांची सेवा 26 वर्ष झाली होती. याप्रसंगी पोलिस अधिक्षकांनी तेलंगे कुटुंबियांना भविष्यातील कोणत्याही अडचणींना मदत करेल असे सांगितले. याप्रसंगी पोलिस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, चौधरी यांनी सुध्दा तेलंगे कुटुंबियांची संवाद साधून त्यांना धीर दिला.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com