सावधान ! दोन्ही लसी घेतल्या तरीही होतेय कोरोनाची लागण

देलसीकरण झाले त्यांना Corona होणार नाही अशा प्रकारचा संभ्रम नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे.
सावधान ! दोन्ही लसी घेतल्या तरीही होतेय कोरोनाची लागण
vaccinationSaamTV

मंगेश मोहिते -

नागपूर : नागपूरसह देशामध्ये आजपर्यंत कोट्यावधी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र ज्या सर्वांचे लसीकरण (Vaccination) झाले त्यांना कोरोना (Corona) होणार नाही अशा प्रकारचा संभ्रम नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आणि त्यामुळेच अनेकजण कोरोना नियमांचे पालन करत नाहीत. आणि याचाच परिणाम की काय नागपुरात मागील 14 दिवसांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या 34 जणांनना तर एक डोस घेतलेल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना सावधान कोरोनाची लस घतली म्हणून गाफील राहू नका असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा -

दरम्यान या डोस घेतलेल्यांपैकी एक जणाची प्रकृती सध्या चिंताजणक होती मात्र सुदैवाने तो आता बरा झाला आहे. त्यामुळे आता कोरोना लस घेतली म्हणून गाफिल न राहता प्रत्येकाने कोरोना नियम पाळायला हवेत.

vaccination
BJPच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा; काँग्रेस नाराज.. पुण्यात 'मविआ' मध्ये धुसपुस

मास्क (Mask) लावणे, सोशस डीस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच आपण जर बेजबाबदारपणे वागलो तर ते आपल्या जीवावरती बेतू शकते त्यामुळे कोरोनाची लस घेतल्या नंतरही शासनाने कोरोना संक्रमना बाबत तयार केलेल्या नियमावलीचं पालन करावे असे आवाहन नागपूर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांनी नागरिकांना केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com